नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 4

  • 13.9k
  • 4.8k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (4) ढवळेपाटील वाडीतील बडे प्रस्थ. आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली पाटीलकी. दुमजली ऐसपैस चौसोपी वाडा. ढवळेवाडा म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. आजबाजूच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाटलांचा नावलौकिक होता. दरारा होता. पाटलांचा स्वभाव प्रेमळ. त्यामुळे लोकांना ते हवेहवेसे वाटायचे. पंचक्रोशीतील भांडण तंटा सोडवण्यात आणि न्यायनिवाडा करण्यात पाटील एकदम वाकबगार. लोकं तालुक्याच्या कचेरीत जाण्यापेक्षा पाटलांकडेच यायची. तालुक्याहून एके शनिवारी अमावस्येच्या रात्री माघारी येताना घाटात झालेल्या अपघातात वडीलांचा अकस्मात मृत्यू झाला. सारी जबाबदारी वीस बावीस वर्षांच्या सुभानरावांवर आली. अशाही परिस्थितीत सुभानरावांनी आपल्या वडिलांइतकीच कीर्ती मिळवली. भारदस्त व्यक्तिमत्व, उंचपुरे आणि आवाजातली धार पाटलांना शोभत असे. मृत्यूसमयी वडिलांच्या इच्छेखातर मित्राच्या मुलीशी कुसाबाईशी पाटलांना