राखणदार. - 2

  • 15k
  • 1
  • 10.7k

राखणदार प्रकरण -- 2 तेव्हा तानाजीरावांच्या वडिलांची मोठी बहीण --- दुर्गाआत्या आडगावात रहात होती. थोड्याच दिवसांपूर्वी तिच्या पतींचे माधवरावांचे हृदयविकाराने अचानक निधन झालं होतं. मुलं - बाळं नसल्यामुळे मोठ्या वाड्यात तिला एकटीलाच रहावं लागत होतं. रात्री सोबतीला एक गावातली मैत्रीण येत असे. आत्याचं तालुक्याच्या गावी प्राॅपर्टीचं काम होतं. तिनं फोन करून भावाला सोबत येण्याची गळ घातली कारण कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपसणं महत्वाचं होतं. नारायणरावांनी स्वतः न जाता तानाजीरावांना पाठवलं. तिकडे धावपळ करायला तरूण माणूस असणं गरजेचं आहे असं त्यांचं मत पडलं. वडिलांचं म्हणणं तानाजीराव डावलू शकले नाहीत. सकाळी न्याहारीच्या वेळी ते आत्याकडे पोहोचले. ती त्यांची वाट पहातच होती. चहा-