कोरोना आणि बदलते जग ( भाग - २ )

  • 7.6k
  • 1
  • 1.9k

कोरोना वॉरिअर प्रिय मित्रा , तुझी धावपळ लक्षात येते आहे...तुझी धडपड कळते आहे....साथीच्या आजाराने होरपळलेली माणुसकी , त्यांच्या रक्षणासाठी तुझी चालेली कसोशी....आता तरी खाकीतल्या तुझ्या मागच्या विहीन वृत्तीच प्रत्येकाला झालेलं दर्शन पटणारं असेल , असावंच ते ! "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" चांगल्याची रक्षा करणे आणि वाईटाचा नायनाट करणे हे तुझं ब्रीद वाक्य....ह्या वाक्य प्रमाणे तू तुझं कर्तव्य कायमस्वरूपी बजावत आलाय. एक चिमुरडी आपल्या आईला सांगते , आई बाहेर नको ना ग जाऊस.... बाहेर कोरोना आलाय.... आई नको जाऊ म्हणारी ती चिमुरडी आई पासून आपल्या दुरावतेय....तिची आई घरात एक माता असली तरी घर सांभाळून आपलं मातृत्व