सावित्रीची गोष्ट

(11)
  • 6.8k
  • 1
  • 2k

#सावीत्री_ची_गोष्ट.... मिलीटरी हॉस्पिटलमधे सद्ध्या पेशंट्सचा पूर आलेला… व्हायरलची साथ होती…आज पुन्हा नाईट ड्युटी आहे हे कळल्यावर जरा वैतागच आला तिला...मुलींचे पडलेले चेहरे आठवले...आज सकाळीही ड्युटी आणि रात्री पुन्हा!... म्हणजे जेमतेम ४-५ तास मुलींबरोबर घालवायला मिळणार...घरी जाता जाता तिने त्याला फोन लावला... तो कामात होता... पण त्यातून ती वैतागल्यावर नेहमीसारखं चिडवलं मात्र... “ काय मग आज नवरा गस्तीवर... मुली घरी... तू हॉस्पिटलमध्ये... आज रात्री कुठली मुव्ही बघणारेस मोबाईल वर!... मजा आहे बाबा... ए.सी. त ड्युटी देणारे ऑफिसर तुम्ही!.. आमच्या नशिबी गोळ्यांचे आवाज!!”... ती चिडली तसा खळखळून हसला... पण आज बाकी बोलणं झालंच नाही....ती घरी आली... जेवली.. जरा आडवी झाली...शेजारी मुलींचा चिवचिवाट चालूच