अधांतर - ४

  • 8.3k
  • 1
  • 3.4k

जिंदगी के स्कुल की, बस एक ही शर्त है। इम्तिहान देकर ही, सबक पढना होता है। प्रख्यात कादंबरीकार अर्नेस्ट हमिंगवे म्हणतात, "सम्पूर्ण काळोखातच प्रकाशाला शिरता येतं.." म्हणजे अंधार असल्याशिवाय प्रकाशाला काही महत्त्वच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. काय म्हणतात अभय सर, 'पोटेन्शीयल'....ते म्हणतात आपलं खर पोटेन्शीयल आपण किती यश मिळवलं त्यात नाही तर आपल्या अपयशांना कश्याप्रकारे पचवलं यात आहे...त्यांच्या याच गोष्टी मला खराब परिस्थिती सोबत दोन हात करायला प्रोत्साहन देतात..खूप वेळा अस होत की पहिल्या प्रयत्नातच यश मिळत आणि खूप वेळा मात्र यशस्वी होण्याच्या रस्त्यात स्वतःला झिजवावं लागतं...आणि पहिल्या परिस्थितीपेक्षा दुसरी परिस्थिती आपल्याला जास्त प्रगल्भ बनवते अस माझं मत