दोन टोक. भाग १७

(19)
  • 11.5k
  • 1
  • 5.2k

भाग १७विशाखा कॅब बुक करतच होती की मागुन आवाज आला, " अरे रडकु तु इकडे " मागे वळुन बघितल तर समोर आकाश. " तु काय माझा पाठलाग करत असतोस का रे ?? नेहमी कसा समोर येऊन टपकतोस ?? " " एक बाई मी का तुझा पाठलाग करेन ?. जाताना दिसलीस म्हणून हाक मारली. पण तु काय करतीयेस इथे एवढ्या रात्री ?? " " मी घरी जात होते पण गाडी बंद पडली म्हणून थांबले. " " ओह पण गाडी कुठे आहे ?. मला तर वाटतंय की तुच माझा पाठलाग करतीयेस. " " गाडी मेकॅनिक घेऊन गेला. आणि मी का तुझा पाठलाग करू ? ?? " " ते तुलाच माहिती