अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 4

  • 5.7k
  • 2.6k

(४) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? आठ-दहा दिवसानंतरची गोष्ट! डॉ. संदेश आणि अनिता यांच्या भेटीनंतर आणि त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या चर्चेनंतर लता कमालीची बदलली होती. प्रसंगोपात हसतही होती. अधूनमधून स्वयंपाक घरात जाऊन आईबाबांना आवडणारे पदार्थ स्वतः बनवून त्या दोघांना खाऊ घालत होती. आशाही दररोज येत होती. त्यादिवशीही आशा आली होती. सारे जण बैठकीत गप्पा मारत असताना फोनची घंटी वाजली. फोन उचलून वामनराव म्हणाले,"हॅलो, मी वामनराव बोलतोय...""हे बघा, एक कृपा करा, आम्हाला तुमच्या मुलीच्या बंधनातून कायमचं मुक्त करा...""मी नाही समजलो. काय म्हणायचे तुम्हाला?" वामनरावांनी विचारले."स्पष्ट सांगितल्याशिवाय तुम्हाला कळतच नसेल तर ऐका,आम्हाला घटस्फोट हवाय.""घटस्फोट? नाथराव, अजून आम्ही त्या धक्क्यातून सावरलो नाहीत...""तुम्हाला काय