परवड भाग १२

  • 7k
  • 3.8k

भाग १२.सुनंदा आपली जीवनकथा अरविंदाला सांगत होती......“माझ्या मालकाची डेड बॉडी समोर आली आणि मला भोवळच आली.आता पुढे काय? हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा होता. कंपनीतून काही पैसे मिळाले होते;पण सहा महिन्यातच ते संपले.आता स्वत: कमावल्याशिवाय पोटाला खायला मिळणार नव्हते. हातपाय गाळून उपयोग नव्हता.राहुलच्या भविष्याचा विचार करून कंबर कसली व् चार घरी मोलमजूरीची कामे धरली.मुलाचे शिक्षण चालू ठेवले. आधीच्या घराचे भाड़े परवडत नव्हते त्यामुळे झोपडपट्टीत कमी भाड्याची खोली घेतली.परिस्थिती माणसाला घडवते असे म्हणतात ते खरे आहे!;पण एका तरुण विधवेकडे पहाण्याचा लोकांचा दृष्टीकोन काय असतो याचा समाजात वागताना घडोघडी अनुभव यायला लागला. कुंकवाच्या धन्याशिवाय जगत असलेली बाई म्हणजे समाजातल्या गिधाडांना सहज उपलब्ध असलेले