नवनाथ महात्म्य भाग १९

  • 9.3k
  • 2.8k

नवनाथ महात्म्य भाग १९ देव दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणुन विचारले. तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारद म्हणाला, “त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते. अविचाराने मुलगा मात्र त्याने हातातला घालविला. त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली आहे हे नक्की . आता तू त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा.” ह्याप्रमाणें नारदाने सांगताच, चरपटीसने परत घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला,” तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठे तरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहूं.” मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास