कादंबरी- जिवलगा ..भाग -३४ वा

(25)
  • 15.9k
  • 5.3k

कादंबरी – जिवलगा भाग – ३४ वा ------------------------------------------------------------ अनिता -सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणेचऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या , आणि गेटच्या बाहेर आल्यावर त्यांना हेमू पांडे उभा आहे असे दिसले . अनिता म्हणाली ..सोनिया .. जरा बघ बरे आपल्याला समोर उभा दिसतो आहे तो आपला हेमू पांडेच आहे ना ..ग ! सोनिया म्हणाली ..मी सांगितले असते ग..काय करू .. मेरी दूर की नजर जरा काम होई गयी ही आजकाल .. ! असे करू या - जरा या नेहालाच सांगू या नेहा बघ आणि सांग तरी नक्की कोण आहे तो .. तो पलीकडे पलीकडे उभा असलेला इसम ..! त्या दोघींची मस्करी नेहाला