महती शक्तीपिठांची भाग ४

  • 6.4k
  • 1
  • 2.3k

महती शक्तीपीठांची भाग ४ 1३)ज्वालामुखी - सिद्धिदा (अंबिका) शक्तीपीठ ज्वालामुखी शक्तीपीठ हे कांगडा जिल्हा , हिमाचल प्रदेश येथे आहे . कांगडा जिल्ह्यात कालीधर डोंगराच्या पायथ्याशी हे रमणीय 'शक्तिपीठ' आहे . आईचे रूप इथे 'सिद्धिदा अंबिका' आहे ,सोबत शिवशंकर 'माणिकट '”उन्मत्त “रुपात विराजमान आहेत. या ठिकाणी आई सतीची जीभ पडली होती. यास ज्वालाजी शक्तीपीठ म्हणतात . या विशेष मंदिरात दहा ज्योती आहेत, परंतु आतमध्ये अनेक ज्वाला उमटत आहेत, ज्या मंदिराच्या पाठीमागून गेल्या आहेत. तसे हे दिवे अनंत काळापासून जळत आहेत असे मानतात . पौराणीक आधारा नुसार असा विश्वास आहे की सात बहिणी आईबरोबर ज्वाला म्हणून राहतात. या ज्वाला