परवड भाग १६ - अंतिम भाग

(21)
  • 7.2k
  • 3.5k

परवड भाग १६ त्या दिवशी अरविंदा सुनंदाच्या जुन्या झोपडीकड़े गेला,त्याचा अंदाज बरोबर ठरला. सुनंदा तिच्या आधीच्या झोपडीत येऊन राहिली होती.अरविंदाला बघताच सुनंदाने तोंड फिरवले. तिच्या त्या वागण्याकडे दुर्लक्ष करून तो तिची समजूत काढू लागला, तिची विनवणी केली,तिला अक्षरश: हात जोडले;पण सुनंदा काहीएक ऐकायला तयार नव्हती! तिचा एकच हेका चालू होता...“वसंता त्या घरात असेपर्यंत मी त्या घरात पाय ठेवणार नाही!”अरविंदा हताश होऊन घरी परतला. लग्न ठरवताना “आंधळ्या वसंताचे पालनपोषण मी स्वत:च्या मुलासारखे करीन.” असे सुनंदाने अरविंदाला वचन दिले होते;पण तो दिलेला शब्द तिने आता मोडला होता! अरविंदाचे मित्र-देशमाने लग्न ठरवताना बरोबर होते किंबहुना त्या दोघांचा हा नवा डाव सुरू करण्यात देशामानेंनी महत्वाची