गच्च अज्ञानाचा घडा

  • 5.5k
  • 1.6k

प्राथमिक शिक्षण वस्तीवर झाले परंतु माध्यमिक शिक्षणाची सोय वस्तीवर नसल्याने प्रत्येक मुलाला वस्तीबाहेर पडावं लागतं. जो वस्तीबाहेर पडला तोच शिकला अशाच परिस्थितीने माझं शिक्षण पुर्ण झालं. असं शिक्षण पूर्ण करणारा दोनशेहून अधिक मुलांमधून मी एकटाच आहे. याचा मला अभिमान वाटत असला तरी वस्तीवरील परीस्थितीची खुप खंत वाटते. खंत याचीच वाटते की विसाव्या शतकातील भारतात अजून कोणती वाडी वस्ती अशी आहे की त्या वस्तीवर शिक्षणाचे प्रमाण दोनशे मध्ये एक आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात दौंड एक तालुका त्या तालुक्यात पाटस हे गाव. गावापासून तीन किलो मीटर अंतरावर एक डोंगराच्या कडेला असलेली एक