कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २१ वा

  • 4.8k
  • 1.7k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २१ वा ----------------------------------------------------------------- सकाळपासून अनुशाच्या मनात एकच विचार चालू होता ..की – ज्या गोष्टी सागर देशमुख यांच्याकडून जाणून घायच्या आहेत ..त्याची कशी तयारी करायची ? याचा विचार करीत .बसली होती . .आणि असे प्रश्न विचारले तर .देशमुखसरांची प्रतिक्रिया एकदम विरुध्द असली तर..आपण हाती घेतलेले कार्य ..पूर्ण होण्याची शक्यता अजिबात नव्हती . या भीतीने तिचे मन अगदी व्यापून टाकलेले होते .. गेल्या आठवड्यातल्या भेटीत ..स्वतःबद्दल सांगण्यासाठी , स्वतः देशमुख अतिशय उत्सुक दिसले दुसर्यांच्या मनात आपल्याबद्दल आता काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी ... सरांच्या या सकारात्मक प्रतिसादाने .आपल्याला खूप आशादायक वाटते आहे हे