मी तुमचा महाराष्ट्र.....

  • 6.2k
  • 1
  • 1.7k

मी महाराष्ट्र....! होय तुमचा महाराष्ट्र....!! संतांची भूमी, प्राचीन इतिहास, पर्यटन लाभलेला महाराष्ट्र. इतकेच नव्हे तर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण पणास लाऊन माझ्यासाठी लढलेल्या त्या १०७ हुतात्म्यांच्या रक्ताच्या थेंबाने निर्माण झालेला महाराष्ट्र...! मी आज तुम्हा सर्वांशी समर्थपणे बोलू शकतो. त्याचे कारणही तसेच, कित्येक शुर माझ्या निर्मितीसाठी झटलेत. शिवाजी, संभाजी इतकेच नव्हे तर, तळागाळातील प्रत्येक माणूस माझ्या अस्तित्वासाठी झटला आणि आजही आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झटतच आहे. अशा या उदात्त बलिदानाचा मी नेहमीच ऋणी असेल.? संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरोबा कुंभार, संत तुकाराम अशा संतांची भूमी म्हणून मिळालेला मान असो किंवा पुरोगामित्वाचा मान