सौभाग्य व ती! - 29

  • 5.7k
  • 2.1k

२९) सौभाग्य व ती! सायंकाळची वेळ होती. खोलीतील आलमारीवर लावलेल्या मोठ्या आरशामध्ये तिने स्वतःला पाहिलं. ती तिच्या प्रतिबिंबाला पाहतच राहिली. रोजच्या सौंदर्यामध्ये आणि त्यादिवशीच्या तिच्या सौंदर्यामध्ये बराच फरक तिला जाणवला. रोजच्या साजशृंगारामध्ये असलेला तोच तोच पणा कुठेही दिसत नव्हता. उलट रोजच्या त्या चेहऱ्यावरील शृंगारास त्यादिवशी लज्जेची लाली शोभून दिसत होती. चेहऱ्यावर आलेली लाली आणि तेज वेगळेच काही तरी सांगत होते. सोबत चेहऱ्यावर एक आशा होती, एक उत्सुकता होती. अनेक प्रश्नही होतेच. ती रोजच नटतथटत असली तरी त्यादिवशी तिला