सौभाग्य व ती! - 31

(12)
  • 6.2k
  • 1
  • 2.9k

३१) सौभाग्य व ती ! सदाशिवच्या घरापुढे बाळूने मोटारसायकल ऊभी केली. इकडेतिकडे नजर फिरवली. गल्लीमध्ये विशेष फरक पडला नव्हता. प्रभा आणि सदाशिव या दोघांच्या जुन्या वाड्याचे नुतनीकरण करून एकत्रित बांधलेल्या बंगल्याची पार दुर्दशा झाली होती. सारा रंग उडून गेला होता. अनेक ठिकाणी रंगासोबत सिमेंटनेही साथ सोडली होती. एकंदरीत बंगला कसा विद्रुप दिसत होता. बंगल्यासमोर दोन-तीन उकंडेही पडले होते. दारासमोर आबालवृद्धांची विष्ठा पडली होती. नयनच्या काळात तोच भाग सडा, रांगोळ्यामुळे मनमोहक दिसत असे. 'अशी अवकळा का यावी? बंगल्यात माणसे राहतात ना? इतक्या वर्षांनी माझी आठवण का झाली? जेव्हा सदाशिवने माझा अपमान केला आणि मी वाड्यातून बाहेर पडलो त्या गोष्टीस कितीतरी