गुरु चांगला असावा

  • 9.9k
  • 2.6k

9. गुरु चांगला असावा आम्ही शाळेत जातो. अभ्यास करतो. आम्हाला आनंद वाटतो. आवडही वाटते. शिकावेसे वाटते. कारण आम्हाला आमचा शिक्षक आवडतो. हवाहवासा वाटतो. कारण तो चांगला असतो. आम्ही निरीक्षणातून शिकत असतो. वावरत असतो. गुरूचं जेव्हा आम्ही निरीक्षण करतो, तेव्हा चांगल्या गोष्टी ज्या घ्यायला हव्या असतात. त्या घेतो. त्याचबरोबर वाईटही गोष्टी घेतो. आपल्या शिक्षकाचे खर्रा खाणे, दारु पिणे व्याभीचार करणे ह्याही गोष्टी आम्ही घेतो. कारण आमचा शिक्षक तसा असतो. पुर्वी शिक्षक शिकवायचा आम्ही अनुकरण करायचो. त्यामुळं आम्हाला पावकी निमकी आठवणीत राहायची मोठे होईपर्यंत व म्हातारे होईपर्यंत. पण आज तसं नाही. आज साधे दहापर्यंत तरी विद्यार्थ्यांचे पाढे पाठ राहात नाही. कारण शिकवणं.