शोध अस्तित्वाचा (भाग १)

  • 17.3k
  • 6k

'आई झाली का ग तुझी तयारी?? चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली. 'हो ग बेटा, झाली माझी तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले.. आज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते.. त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस.. नंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले.. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या.. तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले.. समिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..? इतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची