बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 5

  • 10.8k
  • 1
  • 5.2k

५. वाघाची शिकार               भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गुंजन मावळातल्या गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून