सुवर्णमती - 8

  • 5.6k
  • 2.6k

8 सर्व मंडळी महाली परतली. सेवक घोडे घेऊन येतील, आता सर्वांनी मोटरगाडीनेच जावे असा प्रस्तावबरहुकूम दोन्ही राजांनी ऐकवला तेव्हा कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सायंकाळी दोन्ही राजे आणि सूर्यनाग यांची गुप्त बैठक झाली, ज्यात परकीय संकटावर चर्चा आणि त्यावर एकत्र राहून, एकजुटीने सामना करावा, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवून, आपल्या जनतेला कमीतकमी कसा त्रास होईल, यासाठी प्रयत्न करावा असे ठरले. सूर्यनागाने आराखडा सर्वांसमोर मांडला. दोन्ही देशांच्या सीमा, त्यांना जोडणारे इतर देश, त्यांच्यातील आपसीसंबंध, त्यांचे परकीयांशी संबंध, त्यांचे आपल्याशी संबंध, सगळ्याचा विचार सूर्यनागाने संपूर्ण मांडला त्या दोघांसमोर. सुरजप्रतापसिंह अत्यंत प्रभावित होऊन, त्याचे मुद्दे ऐकत होते. अगदी असाच जामात हवा होता या