आपणच विजयी होऊया

  • 4.7k
  • 1
  • 1.4k

परवा मला माझ्या एका प्रशिक्षणार्थाचा फोन आला. कामाच्या संबंधी चार गोष्टी बोलून झाल्यावर चर्चा सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीकडे सरकली. बोलता बोलता त्या प्रशिक्षणार्थीने मला थेट विनंती केली -"सर, या कोरोनापेक्षा मरणाची मनात खुप भीती बसली आहे. त्याबाबत मला काहीतरी मार्गदर्शन कराल तर खूप बरं होईल.'' तिच्या मनातली मरणाची भीती दूर करण्यासाठी तिच्याशी मी सविस्तर बोललो. तिचं समाधान झालं असावं कारण शेवटी फोन बंद करताना ती मला खूष वाटली. त्यानंतर काही वेळ मी याच गोष्टीचा विचार करीत राहीलो. मला लक्षात आले की त्या एका प्रशिक्षणार्थीच्या मनात असलेली मरणाची भीती आपण दूर केली; पण जगात आपल्या अवतीभवती असे अनेक लोक असतील त्यांच्या मनात