अधांतर - १४

  • 6k
  • 2.3k

गज़ब की धूप मे,छाँव सा मिला।खुद को पाया मैने,ऐसा आईना मिला।कधी तरी आयुष्यात एक काळ असा येतो की एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना सगळ्या निराशा पसरवून जातात, कुठेतरी हा विश्वास व्हायला लागतो की आता आपल्या सोबत काही चांगलं घडणारच नाही....आणि तीच गोष्ट सत्य समजून आपण ही त्याच निराशेच्या प्रवाहात वाहत जातो, त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न तर दूर, विचार ही करत नाही...अशा वेळी गरज असते फक्त एका कवडस्याची जिथून अंधार भेदून एक किरण आपल्या काळोखात शिरेल आणि आपलं आयुष्य बदलवून टाकेल... कधी कधी ती आशेची किरण आपल्याला शोधून काढावी लागते तर काही वेळेस ती अकस्मातपणे आपल्या समोर येऊन उभी