अधांतर - १७

  • 6k
  • 2.2k

सभी सिकंदर यहा पर,कोई नही है फकीर।साये मे भी दिखती, है रोशनी की लकीर।मला अभय सर नेहमी बोलायचे कोणी आपल्याला कमी समजलं म्हणून आपण कमी होत नाही, किंवा आपण काही मोठं काम केलं म्हणून महान होत नाही, खरं तर एक मनुष्य केवळ आपली कर्म करू शकतो, आपण महान आहे की लहान आहे हे फक्त एक 'टॅग' आहे ज्याची किंमत बदलत जाते...आणि आपण फक्त चांगले कर्म घमंड न करता करायचे, तेच आपल्याला अनमोल बनवतील ज्याची कुठेच किंमत लावता येणार नाही, ते अनमोल असतील....हेच शब्द होते जे माझा आत्मविश्वास वाढवत होते, पण विक्रम मला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नव्हता...आणि याचं एकच कारण