सुखी भव - सुखाची नवीन परिभाषा

  • 8.6k
  • 2
  • 2.3k

सुखाचा शोध एक वेगळ्या दशनबिंदु मधून घडविण्याचा आणि सुखाबद्दलचा बाह्य दृष्टिकोन बदलून नवमर्मदृष्टीची अनुभूती सर्वांना करून देण्याचा यत्न मी करीत आहे . तथापि वाचकांनी अन्याय, अत्याचार ,अनाचार यातही सकारात्मकता आणि सुख शोधावे , अशी माझी मुळीच ईच्छा नाही. फक्त दैनंदिन जीवनातील कुरबुरीच्या छोट्या - मोठ्या तडा , भेगा सांधण्याचा माझा हा प्रयत्न आहे . तसही सामान्य माणसाच्या जीवनाचं हे जरतारी वस्त्र विरून , शंभर दुःखांच्या धाग्यांना तडजोडीची ठिगळं ही लागलीत . मध्यम वर्गीयांच्या संसाराचा हा आंबट आवळा , नवमर्मदृष्टीच्या एकतारी पाकात मुरून मनातल्या पानाची रंगत वाढवेल यात शंका नाही. प्राचीन काळ . तपस्वी ऋषींचा आश्रम.