अधांतर - २३

  • 6.4k
  • 2.2k

"कुछ इस कदर जिंदगी ने, आईना दिखाया है मुझे। अपनो ने ठुकराया और, गैरो ने संभाला है मुझे।" माझं हे मानणं आहे, आपल्या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त काही नाते असे असतात जे रक्ताच्या नात्यापेक्षा ही जड ठरतात...रक्त कितीही घट्ट असलं, तरी हे जे मनाचे ऋणानुबंध असतात ते त्या रक्ताची भिंत तोडून, मनाला छेदून आत्म्यापर्यंत पोहोचतात.. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक नातं तरी असतं हा माझा समज, नव्हे, विश्वास आहे...कधी ते नातं आपल्याला मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये भेटतं, कधी आपल्या सहकाऱ्यांमध्ये, तर कधी आपले गुरुवर्य या नात्याची जाणीव करून देतात आपल्याला, असे नाते आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, पदोपदी आपलं मार्गदर्शन करतात, आपल्याला बळ देतात, फक्त