कवी असह्य. - 2 - असह्यांच झेंगाट.

  • 9.8k
  • 2.9k

चेकाळलेली दहशतवादी टोळी, बोकाळलेली महागाई व ढासळलेली अर्थव्यवस्था यापेक्षा चुरगळलेली प्रेमचिठ्ठी आणि त्यात मुरगळलेली मने ही आजच्या तरुणाईला जास्त जवळची वाटतात. शरीरात रसायनांची आलबेल झाल्याने लागलीच उत्क्रांतिवादाची सूत्रे स्वतःकडे घेऊन निसर्गाला उन्नतीकडे नेणे कोणाला नको असेल? असे असले तरी प्रत्येकाने देशाकडे सुद्धा लक्ष दिलेच पाहिजे. त्यासाठी मग लग्न नावाची संकल्पना जन्मास आली! लग्न झालं की उत्क्रांतिवाद ते औद्योगिक क्रांती असा प्रवास माणूस करतो, हा माझा स्वानुभव आहे. देशातील तरुणांना धडाधड बोहल्यावर चढवल्याने पटापट देश पुढे जाईल या सरळसोट मताचा मी आहे! हे इतकं सोपं रहस्य आज मला असह्यांच्या गळी उतरवताना भगीरथ प्रयत्न करावे लागत होते. एकीकडे मला कामाला