श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 3

  • 7.3k
  • 3k

ज्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या .ज्यांनी पांडुरंगाचे सम चरण पाहिले .त्या मनुष्याला अनंत तीर्थ केल्याचे पुण्य लाभते. अशी धारणा विठ्ठलभक्त लोकांच्या मनात निर्माण झाली. श्री विठ्ठलाला फक्त दही दुध भाताचा साधा नैवेद्य चालतो. त्याला पेढे नकोत. त्याला मोठमोठ्या मिठाया नकोत. गळ्यामध्ये सोन्याचा हार नको. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की विठ्ठल प्रसन्न झाला . असा सोपा विठ्ठल खेडूत लोकांच्या आवडीचा आहे. शेख महंमद इस्लाम धर्मीय होता. विठोबाच्या भक्तीमुळे तो मराठी संत वाड्मयात अमर झाला. सजन कसाई फकीर सुद्धा विठ्ठलाचे भजन गाऊ लागला. शेख महंमद वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत होता. तो सुफी पंथाशी संबंधित होता. शेख मोहम्मद यांचे गुरु