दिलदार कजरी - 10

  • 6.6k
  • 1
  • 2.3k

१० द्वितीयोध्याय:! प्रथमग्रासे माशीपतनाचा अनुभव खरोखरच येत राहिल असे दिलदारला वाटले नव्हते. म्हणजे गावाच्या वेशीवर त्याचा व्यवसाय बंधू दिसावा नि त्यामुळे सारंच बिघडू लागावे? हाती पत्रे घेऊन इकडेतिकडे न पाहाता तो देवळाबाहेर पोहोचला. सायकल उभी ठेऊन कजरी दर्शनाची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला ध्यानात आले, हे असे उभे राहणे जास्त वेळ शक्य नाही कारण उभ्या उभ्या सवाल येऊ लागले, "नवीन आलाय जणू?" "मास्तर, शहरासून चिठ्ठी आली का?" "सकाळची डाक कितीला निघते?" "मास्तर, गाव कोणतं तुमचं?" असल्या प्रश्नांचा मारा चुकवायचा असेल तर इथे थांबून चालायचे नाही.. तो देवळात शिरला. घंटी वाजवून देवीला आल्याची वर्दी दिली. एक डोळा आतून कजरीदेवीचे दर्शन