निरक्षर सासू ते साक्षर गाव.

  • 8.9k
  • 2.9k

माझे आणि केशवचे मागील पाच वर्षांपासूचे नाते आज लग्नबंधनात अडकताना मला खूप आनंद होत आहे. या मागील पाच वर्षांत त्याने माझं मनच नाही तर, मला सुद्धा कुठल्याही दुःखाविना सांभाळलं. आता मला इथून पुढे त्याच्या कुटुंबीयांना सांभाळुन स्वतःला सिद्ध करत, माझ्यावर असणाऱ्या त्याच्या निःस्वार्थ प्रेमाची बरोबरी करायची आहे. केशव, माझ्या मामाच्या गावी शेती करणारा एक सर्वसाधारण मुलगा! मी उच्चशिक्षित म्हणून, घरच्यांचा आधी आमच्या नात्याला विरोध होता. मात्र, माझ्या ठाम निर्णयापुढे त्यांची तोकडी विचारसरणी नाईलाजास्तव झुकली आणि आमच्या लग्नाचा शुभमुहूर्त शेवटी निघालाच. माझ्या भावाने मात्र या माझ्या निर्णयामुळे माझ्याशी नातं तोडलं! का? तर, मी एका शेतकरी मुलाला माझा आयुष्याचा साथीदार म्हणून निवडला होता. माझ्या भावाच्या