अश्रुतपूर्व - 2

  • 4.3k
  • 1.9k

घरीच खूप मोठा दिवाणखाना असल्याने तिथेच सगळ्यांचे साखरपुडा व बारसे झाले होते अर्थात माझे बारसेपण तिथेच होणार होते. आता बारशाच्या दिवशी काय नाव ठेवायचे हे ठरवल्यानंतर जेवणाचा बेत, अजून कुठली तयारी करायची, कोण काय काम करणार हे सगळे ठरवणे सुरु झाले होते. आपापल्या कामाची प्रत्येकाने यादी करून जेवण करून सगळे घरी परतले. घरी माझ्या पिढीत शेवटचेच बारसे असल्याने जोरदार तयारी केली होती. जवळपास २००-२५० जण बारश्यासाठी आले होते. सगळीकडे उत्साह पसरला होता. मला काकू व मावशीने खूप छान तयार केले होते. नीलूआत्या माझे नाव ठेवणार होती. एक नाव ठरलेले असल्याने बाकीची ४ नावे आईने सुचवली होती तेव्हा तिने आईला,”तू तीन