आता दिसणे सरले- संत सोहिरोबानाथ

  • 6.9k
  • 2
  • 2.8k

आंबिये बुवा झपाझपा पावलं टाकत सावंतवाडीच्या दिशेने चालले होते.बांदा ते सावंतवाडी हे अंतर सुमारे चार ते पाच कोसांचे.सावंतवाडी राजदरबारातून तातडीच्या सांगावा आला होता.कर्तव्यतत्पर आंबियेबुवांनी त्वरित बाहेर पडण्याची तयारी केली.पत्नी काहीतरी खाऊन चला म्हणून आग्रह करत होती पण त्यांनी नकार दिला. पण त्यांची भगिनी मागून एक झोळी घेवून धावत आली. "अच्युत,हा फणस घेवून जा आईने दिलाय." "अग,आता हा भार कश्याला?" "भार कसला?छोटासा तर आहे.वेळेला उपयोगी पडेल.याच्या रसाळ गर्यांनी तूझी मधुर वाणी अधिक रसाळ बनेल." भगिनी हसत म्हणाली. "ठिक आहे .दे ती झोळी. " बुवांनी झोळी खांद्याला अडकवली व पुन्हा मार्गस्थ झाले. अच्युत आंबिये मूळचे सावंतवाडी संस्थानच्या पेडणे महलातील. खर आडनाव संझगिरी