मोबाईलवेडा रघू

  • 4.8k
  • 1.5k

उद्धव भयवाळ औरंगाबाद मोबाईलवेडा रघू रघू शाळेतून घरी आला आणि त्याने हातातले दप्तर सोफ्यावर पटकले. अंगातील गणवेशसुद्धा न काढता तो तसाच किचनमध्ये आईकडे गेला आणि आईला म्हणाला. "आई, मला आधी तुझा मोबाईल दे. मला एक गेम खेळायचाय त्याच्यावर." "अरे, हो देते. पण आधी अंगातील गणवेश काढून ठेव. तोंड हातपाय धू. जेवण करून घे. मग मोबाईलवर काय खेळायचं ते खेळ." आई त्याला सांगू लागली. पण तो ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे "आधी मला मोबाईल दे. मग जेवायचं बघू." असा एकच धोशा त्याने लावला. शेवटी त्याच्या हट्टापुढे आईला नमते घ्यावे लागले. तिने शोकेसजवळ ठेवलेला मोबाईल त्याला दिला. मग काय, अंगातील गणवेश न काढता सोफ्यावर