पेरजागढ- एक रहस्य.... - ३१

  • 5.2k
  • 1
  • 1.8k

३१. पवनला स्वतःच्या अस्तित्वाची ओढ.... मी फार प्रयत्न केले पण त्या दिवशी आकाशने मला शहराकडे जाऊच दिले नाही.त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी शहराकडे गेलो.शिवाय रितुचे सारखे फोन मला येतच होते.आणि काहीतरी नवीन प्रयत्न करण्यासाठी मला परतीला जाणे आवश्यकच होतं.त्यामुळे सकाळी फार वेळ न दवडता मी शहराकडे परतलो.मी आल्याची वार्ता रितुला न सांगताच कळते हे मला माहीत होतं.त्यामुळे बॅग बाजूला ठेवून मी तिचीच वाट बघत होतो. खरंतर ज्या दिवशीपासून हे मृत्यू प्रकरण माझ्या मागे लागले होते, त्या दिवशीपासून तिच्यातल्या प्रेमाची जागा फक्त एका काळजीने घेतली होती.तिच्या डोळ्यांत असणारं आकर्षण ज्यात आता नुसते चिंतेचे भाव दिसत होते.पूर्वी जेव्हा कधी यायची तिचा लाजाळूपणा कधी