श्री संत एकनाथ महाराज - २६

  • 4.4k
  • 1.1k

  निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥ रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः । सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥ करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती । ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥ तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी । दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥ ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन । शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥ केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥