नेताजीचे सहवासात परिचय लेख

  • 4.7k
  • 1
  • 1.4k

नेताजींचे सहवासात नेताजींची वीर वृत्ती, अभिजात स्वातंत्र्यप्रेम, निष्काम कर्मयोग, नेताजी आणि इतर राजकीय समकालीन नेते, भाषेचा भीषण घोळ, वाद-संवाद माध्यम, पुना ओकांच्या वैयक्तिक संदर्भातील आठवणी, ते वीरश्रीपूर्ण भाषण… वाचा   नेताजींचे सहवासात लेखक -कॅप्टन  पुरुषोत्तम नागेश ओक नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश          कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठी बाजाने केलेल्या  लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला