रामायण व समर्थ रामदास अवतार.

  • 6.7k
  • 1
  • 2k

रामायण व समर्थ रामदास अवतार ___________________________ मच्छिंद्रनाथ माळी छत्रपती . संभाजीनगर रामायणातील रावण युद्धाच्या वेळची घटना आहे. रावणाचे बंधू अहीरावण व महीरावण दोघे पराक्रमी होते. रामाकडून खुपदा मारले गेले , परंतू ते सुर्योदयाला जिवंत होत. याचे कारण मायावी राक्षस भुंग्यांचे रूप घेऊन पाताळात लपविलेल्या अमृतघटातील अमृताचें थेंब या अहीरावण, महीरावणा च्या मुखात आणून घालत. हनुमंतांना ही घटना कळताच त्यांनी सुक्ष्म देह धारण करून पाताळाच्या वाटेवर जाऊन थांबले व त्या भुंग्यांना बंदीस्त केले. सहाजिकच अहीरावण व महीरावण जिवंत झाले नाही व अग्नीसंस्कार केले गेले. त्यांची पत्नी चंद्रसेना कष्टी झाली व रावणाकडे गेली.रामाचे एकपत्नी व्रताच्या प्रभावामुळे रावण विजयी होत नाही हे भाकीत