गुरु चरित्रामृत

  • 9.5k
  • 1
  • 3.6k

धार्मिक कथा ० श्री गुरु चरित्रामृत. ० ----------------------------------- एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की, श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता