सावध - प्रकरण 6

  • 4.5k
  • 2.5k

प्रकरण ६ आपल्या गाडीतून सौम्या ला घेऊन धीरेंद्र तोंडवळकर च्या पत्त्यावर जात असतांना, पाणिनी सौम्याला म्हणाला, “ काहीही म्हण ही पोरगी आवडली मला.” “ पैशाच्या मागे लागलेली पोरगी आहे.” –सौम्या “ मला माहिती आहे ते.तिने सिटी होंडा चा नंबर टिपून घेतला, ब्लॅकमेल करायच्या उद्देशाने.पण नंतर तिचा विचार बदलला.का माहीत नाही.पेपरात जाहिरात पाहून तिने सनदशीर मार्गाने बक्षीस रुपात दहा हजार मिळवायचं ठरवलं. काहीही असो मला तिचा मोकळेपणा आवडला.मी कीर्तीकर च्या गाडीची तपासणी केली आहे.गाडीचे पोचे दिसताहेत.उडालेला रंग पुन्हा नव्याने दिलाय, मागचा टायर नवा कोरा टाकलेला दिसतोय.आणि.....” “ आणि... त्याने गाडी चोरीला गेल्याची सांगितलेली गोष्ट खरी सुध्दा असू शकते.” सौम्या म्हणाली. “