सावध - प्रकरण 8

  • 4.3k
  • 2.5k

प्रकरण ८ मायरा कपाडिया ने आपली गाडी एकदम थांबवली आणि दार उघडून घाबरून उडी मारून बाहेर आली. “काय आहे हे?” पाणिनी कडे बघून ती उद्गारली.“एक माणूस आडवा पडलाय एक तर तो झोपलेला असावा किंवा पिऊन पडला असावा किंवा मेलेला असावा.” पाणिनी सावधपणे म्हणाला. “चल बघूया ”“पुढे होऊन पाणिनीने गॅरेज चे दार सताड उघडलं. त्याबरोबर गाडीच्या हेडलाईटचा झोत त्या माणसाच्या संपूर्ण शरीरावर पडला पाणिनीने खाली वाकून तपासलं तर त्या माणसाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हरच्या गोळीच्या आकाराचे एक भोक पडलं होतं. “सकृत दर्शनी तो मेला आहे असं दिसतय”मायरा कपाडिया अडखळत एक पाऊल पुढे आली. तिच्या घाबरलेल्या श्वासाचा स्पष्ट आवाज पाणिनीला ऐकू आला.“काय आहे हे?