शिकवणं पुण्याचं काम

  • 2.6k
  • 1
  • 948

शिकवणं हे पुण्याचं काम? शिकवणं हे पुण्याचं काम असं कोणी म्हटल्यास लोकं आश्चर्यचकीत होतील. कारण आजच्या काळात शिकविण्याला किंमत उरलेली नाही. किंमत आली आहे पैशाला. कारण पैसा फेक तमाशा देख या वृत्तीनुसार आज जो शिक्षणावर जास्त पैसा खर्च करतो. शिक्षणही त्यालाच मिळत असते. तसं पाहता शिक्षणाला अलिकडे भरपूर पैसा लागत आहे. साधारण डॉक्टरकीचा अभ्यासक्रम शिकतो म्हटल्यास पंचवीस ते तीस लाख रुपये वर्षाकाठी मोजावे लागतात. आजचे शिक्षकही शिक्षण शिकविण्यासाठी भरमसाठ पैसा घेत असतात. त्यामुळंच आज शिकविणे हे पुण्याचं काम राहिलेलं नाही तर ते एक पैसा कमविण्याचं साधन झालेलं आहे. आज गुणवत्ता सरेआम बाजारात विकत मिळत असून तिची बोली लावली जात आहे.