विनाश काले विपरीत बुद्धी

  • 6.3k
  • 2k

अर्थ:- जेव्हा एखाद्याचा विनाश जवळ आलेला असतो तेव्हा त्याला बरोब्बर चुकीची बुद्धी होते आणि तो चुकीचे निर्णय घेऊन चुकीच्या मार्गाला लागतो. त्यावर आधारित कथा:- "विभा उठ! लवकर,आज आकाशवाणी वरचा सुगम संगीताचा कार्यक्रम तुला होस्ट करायचाय, तयारी झाली का तुझी,उशीर व्हायला नको,मला पण बातम्या एकदा recall कराव्या लागतील,चल उठ!",प्रभा विभाला ढोसत म्हणाली. "काय यार! मी कशाला आली होती ह्या मुंबईत, हिरोईन बनायला आणि काय करतेय तर सुगम संगीताचं anchoring, तूझं उगीच ऐकलं मी,किती सकाळी उठावं लागते शी:", विभा म्हणाली. "व्वा गं! हिरोईन! म्हणजे हिरोईन ला फक्त झोप काढायचं काम असते का दिवसभर असं वाटते की काय तुला! हिरॉईनला तर कायम फ्रेश