सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 8

  • 3.8k
  • 1.6k

शामने होडी नक्र बेटाच्या किनार्यावर लावली. त्या वेळी किनार्यावर त्यांची वाट बघत असलेला चांद घोडा आनंदाने खिंकाळला. तो आनंदाने जमीनीवर टापा आपटत आवाज काढू लागला. त्याने चंद्रावतीला ओळखले होते. असंख्य वेळा त्याने तिला आपल्या पाठिवर बसवून रपेट मारली होती.मुकी जनावर आपल्या मालकांवर किती प्रेम करतात नाही,,,,! " चांद बेटा, किती दिवसांनी बघतेय तूला.." चंद्रावती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.तिच्या डोळ्यात आसवे आली होती. सारेजण पुन्हा वाड्यावर परतले.प्रतापराव चंद्रावतीला पाहून आनंदित झाले.जी मृत झाली असं समजून सारे संस्कार केले ती समोर बघून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.त्यांचे सारे शरीर आनंदाने थरथरत होते. आधारासाठी हाती पकडलेली काठी त्यांनी फेकून दिली. " मला