गीत रामायणा वरील विवेचन - 16 - रामाविण राज्यपदी कोण बैसतो?

  • 1.4k
  • 477

पाहता पाहता कैकयी ने भरतास राज्यपदी बसवण्याचा व श्रीरामास वनवासात पाठवण्याचा वर मागितला ही बातमी लक्ष्मणपर्यंत ही पोचते. ती वार्ता ऐकताच लक्ष्मणाची तळपायाची आग मस्तकात जाते. तो त्वेषाने देवी कौसल्येच्या कक्षात येतो जिथे श्रीराम आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. लक्ष्मण म्हणतात " हे रामा तुझ्याविना राज्यपदी बसण्याचा कोणालाही अधिकार नाही. जो कोणी त्यात अडथळा आणेल त्याच्याशी दोन हात करायला मी तयार आहे." "लक्ष्मणा शांत हो! क्रोधाने फक्त नुकसानच होते.",श्रीराम "श्रीरामा तू तर सर्वज्ञ आहे मग तू उगीच का त्या पापिनी कैकयी चे ऐकतोय? कैकयी ला सत्ता हवी आहे. वर,वचन हे फक्त बहाणे आहेत. आणि स्त्रीलंपट तो दशरथ राजा तो