ऑपरेशन एंटेबी

  • 3.3k
  • 1.2k

पुस्तक परिचय.ऑपरेशन ऐंटेबी. रवींद्र गुर्जरफ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते. इतरही देशांचे प्रवासी होतेच. युगांडा दहशतवाद्यांना सहकार्य करत असल्याने विमान युगांडातील एन्टेबी येथे उतरविण्यात आले. तेथे युगांडाचे सैनिक व दहशतवाद्यांच्या पहाऱ्यात सर्वांना एका इमारतीत ठेवण्यात आले. इस्राएली व ज्युंना बाजूला काढण्यात आले. हे विमान फ्रेंच असल्याने फ्रेंच सरकारने हस्तक्षेप करावा अशी इस्राएल सरकारने विनंती केली. दहशतवाद्यांनी त्यांच्या मार्फत वाटाघाटी करण्याचे मान्य केले. इदी अमीन पुर्णपणे दहशतवाद्यांच्या बाजुने होते. खरेतर आधी इस्राएल बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु एकदा त्यांनी शस्त्र पुरवठा नाकारल्याने ते बिघडले. वाटाघाटी सुरु झाल्या नंतर दहशतवाद्यांनी इतर देशांतील कैदी