गीत रामायणा वरील विवेचन - 43 - रघुवरा, बोलत का नाही

  • 1k
  • 237

सेतू बांधत असता रावण त्याचे हेर श्रीरामांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवतो. ते हेर श्रीरामांच्या सैन्यात कोण कोण आहे? केवढी मोठी वानर सेना आहे, त्यांची किती शक्ती आहे? ह्याची संपूर्ण माहिती काढतात. आणि रावणाला लंकेत जाऊन कळवतात. रावण ते ऐकून आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश देतो. रावणाचा कनिष्ठ भ्राता विभीषण रावणाला पदोपदी समजावतो. हे लंकेश अजूनही वेळ गेली नाही. रामाला त्याची पत्नी सन्मानपूर्वक अर्पण करा आणि लंकेचा विध्वंस होण्यापासून वाचवा. श्रीराम दयाळू आहेत ते तुम्हाला क्षमा करतील. आपण अत्यंत महान राजे आहात. पुलत्स ऋषींचे पुत्र आहात. आपण शंकराचे परम भक्त आहात. आपल्याला एका परस्त्री साठी असे युद्ध करणे शोभत नाही. ज्या