गीत रामायणा वरील विवेचन - 47 - लंकेवर काळ कठीण आज पातला

  • 957
  • 318

युद्ध अखंड सुरू असते. वानरसेना राक्षस सेना एकमेकांना शस्त्राने उत्तर देत होती.इकडे मेघनाद राम व लक्ष्मणांना नागपाश बाणाने बंदिस्त करतो त्यामुळे वानर सेनेत गोंधळ आणि दैत्य सेनेत विजय सुरू असतो पण गरूडला बोलावण्यात येते व तो ते नागपाश् तोडून श्रीराम व लक्ष्मण यांना मोकळे करतो. पुन्हा श्रीराम व लक्ष्मण युद्धात सहभागी होतात.युद्धात रावणाचा सेनापती प्रहस्त नील वानरकडून मारला जातो. त्यामुळे रावण युद्धात सहभागी होतो.श्रीराम रावणाशी तर लक्ष्मण रावण पुत्र इंद्रजित शी तोडीस तोड युद्ध करण्यात गुंततात. विभीषण,सुग्रीव,हनुमान,नल निल अंगद सगळे युद्धात गुंततात. लक्ष्मणाला जेव्हा कपटाने सुद्धा जिंकता येत नाही हे बघितल्यावर रावण पुत्र मेघनाद उर्फ इंद्रजित ने लक्ष्मणावर शक्ती बाणाचा