अशीही एक शाळा

  • 2.2k
  • 1
  • 876

मनोगत अशीही एक शाळा या नावाची कादंबरी वाचकांसमोर सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या कादंबरीच्या रुपानं मी एक शिकवण देत आहे की माणसानं चांगले कर्म करावे नव्हे तर करीत जावे. त्याचं कारण असं आहे की ज्या निसर्गचक्राला आपण अज्ञात शक्ती म्हणतो. ती शक्ती त्या त्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असते. कादंबरीतील विषयांश असा. एक मुख्याध्यापक एका काळात चांगला सुस्वभावी असतो. परंतू शाळेला जेव्हा अनुदान प्राप्त होते, तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो. स्वार्थ शिरतो त्याच्या मनात. मग तो सर्वच घटकांना त्रास देत असतो. त्याचा परीणाम वाईटच निघतो. तेव्हा तो कोणता परीणाम आहे आणि तो कसा वाईट निघतो? यावर आधारीत माझी