रुधिरारंभ - 3

  • 93

अध्याय ३--------------भूतकाळ कॅमेऱ्यात कैद-----------------------------आदित्य ती हूडी हातात घेऊन परत निघाला. पाटील आणि शिंदेंनी तो मृतदेह ताब्यात घेतला. ते सर्व परत रणगाड्या जवळ जायला निघाले. रणगाड्यात बसून आदित्य तिथल्याच जवळच्या पोलिस ठाण्याकडे जायला निघाला. जवळ पास साडेतीन वाजता ते पोलिस ठाण्याजवळ पोहोचले. गाडीतून उतरून ते तिघेही आता पायवाटेने चालत जुनाट, अर्धवट मोडलेल्या जंगलाच्या हद्दीवरील पोलीस चेकपॉईंटवर परत आले होते. त्याच्यासोबत सोनलची रक्ताने माखलेली हुडी आणि रमेश कदमचा चिखलाने माखलेला डिजिटल कॅमेरा होता. त्याच्या डोळ्यांतली आग इतकी तीव्र होती की पाटील आणि शिंदे यांनी त्याच्याकडे बोलण्याची हिंमत केली नाही. त्यांनी फक्त मृतदेह आणि रक्ताचे नमुने सीलबंद केले होते."पाटील, शिंदे," आदित्यचा आवाज कठोर