एक निरोप असाही... - 4

  • 10.2k
  • 4.1k

    युद्ध होणार याची जाणीव प्रत्येकाला झालीच होती. इकडे लग्न उरकून त्याची बहिण सासरी निघाली. सगळे लग्नात हजर होते पण त्यांचे मन मात्र ह्याच्याकडे लागले होते. ह्याचे मन मात्र वेगळेच विचार करत होते. युद्धात भाग घ्यायला मिळणार म्हणून तो उत्सुक झाला होता. त्याला त्याचे लहानपण आठवले.     शाळेत असताना अचानक व्हरांड्यात लावलेल्या कर्णा म्हणजे जे पत्र्याचे स्पीकर यायचे पहिल्यांदा त्यातून फुंकल्याचा आणि "हॅलो हॅलो माईक टेस्टिंग वन, टू, थ्री माईक टेस्टिंग" असा आवाज आला. सगळ्या मुलांनी एकच गलका केला कारण असे काही वाजले की शाळा लवकर सुटते हे सगळ्यांना माहिती होते. सगळ्यांनी आपापली दप्तर आवरायला घेतली. नेहमी शाळा